Type Here to Get Search Results !

वारजे पोलीस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर चार जणांनी एकाला लुटले

 


पुणे, दि.१६ डिसेंबर २०२२ (चेकमेट टाईम्स): वारजे माळवाडी मधील स्वर्णा हॉटेल रस्त्यावर पायी जात असलेल्या इसमाला दुचाकींवरून आलेल्या चार जणांच्या टोळक्याने अडवून लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे स्वर्णा हॉटेल वारजे पोलीस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर असून, गुन्हा घडला ती वेळ लुटमारी करण्यासारखी नसताना देखील लुटमार झाल्याने परिसरातील नागरिकांत दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

याबाबत रविंद्र सागवेकर (वय.३८, रा.वडगाव बुद्रुक, सिंहगड रोड, पुणे) यांनी वारजे पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दिली आहे. सागवेकर हे रविवार दि.११ डिसेंबर २०२२ रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास स्वर्णा हॉटेल जवळच्या रस्त्याने पायी जात असताना, दुचाकींवरून आलेल्या चार अज्ञात तरुणांनी सागवेकर यांना दमदाटी करत, त्यांच्या खिशातील १ हजार ५०० रुपये रोख, मोबाईल फोन आणि इतर महत्वाची कागदपत्रे जबरी चोरी करून त्यांच्या ताब्यातील दुचाकींवरून पळून गेले.

 

याबाबत वारजे पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर वारजे पोलीस आणि पुणे शहर पोलिसांची गुन्हे शाखा समांतर तपास करत असताना, गुन्हे शाखेने या गुन्ह्यातील संशयित आकाश शिंदे (वय.२५ रा.जाधव नगर, वडगाव, सिंहगड रोड, पुणे), शुभम लोंढे (वय.२५ रा. दांडेकर पूल, पुणे) आणि यश गायकवाड (वय २२ रा. कासेवाडी, पुणे) यांना ताब्यात घेऊन अटक केले आहे. पुढील तपास वारजे पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक यश पडवळे करत आहेत.

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/

आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84


Tags

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
  1. आपचे लोक फारच बोलत असतात. त्यांनी असेच काम करत रहावे म्हणजे भाजपचे काम सोपे होत आहे. का त्या साठीच ते काम करत आहेत?

    उत्तर द्याहटवा